१०० कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट अन्...; अल्लू अर्जूनच्या संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:02 IST2026-04-08T16:27:44+5:302026-04-08T17:02:41+5:30
१०० कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट अन्; आलिशान आयुष्य जगतो पुष्पा स्टार अल्लू अर्जून; एका सिनेमासाठी घेतो 'इतकी' फी

साधारण २००४-०५ साली अवघ्या महाराष्ट्रात एक तेलगू चित्रपट धुमाकूळ घालत होता. त्यातील गाणी प्रत्येक तरुणाच्या तोंडावर होती. आ आंटे आमलापूरो... या गाण्याच्या तर सर्वच प्रेमात पडले होते. या गाण्यानं आर्या या तेलुगू सिनेमाला अपार प्रसिद्धी मिळाली. भाषा कळत नसूनही टॉलीवूडच नाही तर बॉलिवूड प्रेक्षकांनाही प्रेमात पाडणारा अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन.

चित्रपट निर्माता अल्लू अरविंद आणि निर्मला यांच्या घरात ८ एप्रिल १९८३ कर्नाटकातील बेंगलुरु येथे अल्लू अर्जुनचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण सेंट पॅट्रीक स्कूल चैन्नई येथे तर महाविद्यालयीन शिक्षण एमबीएपयंत एमएसआर कॉलेज हैदराबाद येथे झालं.

अभिनयाची पार्श्वभूमी असल्याने अर्जुनने वयाच्या अवघ्या दुसऱ्याच वर्षी रुपेरी पडद्यावर विजेता (१९८५) या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगय्या हे प्रतिथयश अभिनेता होते. तर अर्जुनचे वडील अल्लू अरविंद हे प्रतिथयश चित्रपट निर्माते आहेत व अर्जुनच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे तेच निर्माते आहेत. अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू शिरीष हा देखील अभिनेता आहे.अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीशी २०११ मध्ये विवाह केला असून, त्याला अरहा व अयान ही दोन अपत्ये आहेत.

२००४ मध्ये आलेल्या आर्यातील एकतर्फी प्रेमवीराच्या भूमिकेमुळे अल्लू अर्जुनला राष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर आलेला बन्नी (२००५) या चित्रपटाने व्यवसाय फारसा केला नाही, पण यातील भूमिकेचे बन्नी हे नाव अल्लू अर्जुनच्या नावापुढे कायमचे चिकटले. नंतरच्या हॅप्पी (२००६) या चित्रपटातही त्याच्या भूमिकेचे नाव बन्नीच होते. या चित्रपटाने भारतासह अमेरिकेतही चांगला व्यवसाय केला.

त्यानंतर त्याचे बद्रीनाथ (२०११), जलाई (२०१२), ईददारमेलाथो (२०१३), सन ऑफ सत्यमूर्ति (२०१५), सन ऑफ सत्यमूर्ति २ (२०१६) हे चित्रपट आले. २०२० मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाने घडविलेला इतिहास तर सर्वांसमोर आहेच.

त्यानंतर त्याचे बद्रीनाथ (२०११), जलाई (२०१२), ईददारमेलाथो (२०१३), सन ऑफ सत्यमूर्ति (२०१५), सन ऑफ सत्यमूर्ति २ (२०१६) हे चित्रपट आले. २०२० मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाने घडविलेला इतिहास तर सर्वांसमोर आहेच.

अल्लू अर्जुन अतिशय लक्झरियस लाईफ जगतो. महागड्या गाड्यांची प्रचंड आवड असलेल्या अल्लू अर्जुनकडे बीएमडब्ल्यू , जग्वार, ऑडी आणि रेंज रोवर या गाड्या आहेत. तसेच त्याच्याकडे प्रायव्हेट जेट देखील आहे.

अल्लू अर्जुनचा १०० कोटींचा बंगला आहे. २०१६ मध्ये तो सर्वात जास्त गूगलवर सर्च केलेला टॉलिवूड स्टार ठरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन वर्षाला १५ कोटींची कमाई करतो.मीडिया रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती ३५० कोटी इतकी आहे.

















