Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:19 IST2025-12-01T14:09:44+5:302025-12-01T14:19:49+5:30
Samantha Ruth Prabhu Marraige with Raj Nidimoru : साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने पुन्हा संसार थाटला आहे. समांथाने घटस्फोटानंतर चार वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे.

साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने पुन्हा संसार थाटला आहे. समांथाने घटस्फोटानंतर चार वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे.

लग्नाचे फोटो समांथाने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. समांथाने दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

सोमवारी(१ डिसेंबर) सकाळी लिंग भैरवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने समांथा आणि राज निदिमोरू यांनी सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

लग्नासाठी समांथाने लाल रंगाची साडी आणि केसांत गजरा माळत पारंपरिक लूक केला होता. तर राज यांनी कुर्ता-जॅकेट असा पोशाख केला होता.

समांथाने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत अभिनेत्रीचं अभिनंदन केलं आहे.

समांथाचं पहिलं लग्न नागा चैतन्यसोबत झालं होतं. २०१७ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. पण २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले होते.

नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर समांथा दिग्दर्शक राज निदिमोरु यांना डेट करत होती. काही वर्ष डेट केल्यानंतर आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

















