ना भरजरी साडी ना मेकअप ! बहिणीच्या लग्नात अगदी साध्या लूकमध्येही भाव खाऊन गेली साई पल्लवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:13 IST2024-12-30T12:10:21+5:302024-12-30T12:13:05+5:30
बहिणीच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो साई पल्लवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

साई पल्लवी ही साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
साई पल्लवी तिच्या अभिनयाबरोबरच नो मेकअप लूक पॉलिसीसाठीही ओळखली जाते. नुकतंच तिच्या बहिणीचं लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडलं.
बहिणीच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो साई पल्लवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
साई पल्लवीने तिच्या बहिणीच्या लग्नातही नो मेकअप लूक फॉलो केल्याचं दिसलं. अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
कानात खड्यांचे नाजूक कानातले आणि गळ्यात मोत्याची माळ असा अत्यंत साधा लूक तिने केला होता.
बहिणीच्या लग्नात करवली बनलेल्या साई पल्लवीने ना भरजरी साडी नेसली होती ना मेकअप केला होता.
पण, तरीही साध्या लूकमध्येही साई पल्लवी उठून दिसत होती. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.