Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 15:18 IST2024-10-27T15:13:18+5:302024-10-27T15:18:57+5:30

'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतलेल्या मानधनाची सध्या चर्चा रंगली आहे. 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने तगडं मानधन घेतलं आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेला पुष्पा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित झाला. या सिनेमाने चाहत्यांना वेड लावलं होतं.

पुष्पानंतर पुष्पा २च्या प्रतिक्षेत चाहते होते. अखेर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनच्या लूकच्या झलक याआधीच प्रेक्षकांनी पाहिली आहे. त्यामुळे या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

रिलीजआधीच या सिनेमातील गाणीही प्रचंड हिट होत आहेत. 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतलेल्या मानधनाची सध्या चर्चा रंगली आहे.

'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने तगडं मानधन घेतलं आहे. 'पुष्पा' सुपरहिट झाल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या मानधनातही वाढ केली आहे.

ट्रॅक टॉलीवूडने दिलेल्या रिपोर्टनुसार, पुष्पा २ साठी अल्लू अर्जुनने ३०० कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

'पुष्पा २' सिनेमा ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.