बापरे! तब्बल ९५० कोटी संपत्तीचा मालक आहे 'हा' अभिनेता, त्याच्या रॉयल आयुष्यात नक्की आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 10:53 AM2023-08-29T10:53:18+5:302023-08-29T11:16:03+5:30

साऊथमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आज ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे.

साऊथ अभिनेता नागार्जुन (Nagarjuna) लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आज अभिनेता ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही काम केले आहे. १९८६ साली 'विक्रम' सिनेमातून त्याने फिल्मइंडस्ट्रीत पदार्पण केले.

९० चा काळ नागार्जुनने गाजवला. या हँडसम अभिनेत्याला सिनेमात घेण्यासाठी निर्मांत्यांच्या रांगा लागायच्या. १९९० साली त्याने 'शिवा' सिनेमातून बॉलिवूडमध्येही पाऊल टाकले. यानंतर 'खुदा गवाह','क्रिमिनल','मिस्टर बेचारा' सारख्या सिनेमात त्याने काम केले.

नागार्जुन किती श्रीमंत आहे याचा अंदाज लावणंही कठीण आहे. अभिनेत्याकडे जवळपास ९०० कोटींची संपत्ती आहे. फक्त अभिनेताच नाही तर तो निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. तेलुगू इंडस्ट्रीत त्याने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ९०० कोटींचा मालक असलेल्या नागार्जुनकडे नेमकं असं आहे तरी काय बघुया.

नागार्जुनने १९८४ साली पहिलं लग्न केलं. लक्ष्मी दगुबत्तीसोबत तो विवाहबंधनात अडकला. ६ वर्षांनंतर संसार केल्यानंतर १९९० साली त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्य हा त्यांचाच मुलगा. तो देखील आज आघाडीचा अभिनेता आहे.

१९९२ नागार्जुनने अभिनेत्री अमाला सोबत दुसरं लग्न केलं. त्यांना अखिल अक्किनेमी हा मुलगा झाला. अखिल देखील साऊथ फिल्म्समध्ये अभिनय करतो. नागार्जुनच्या संपत्तीविषयी सांगायचं तर त्याच्या अनेक महागड्या कारचं कलेक्शन आहे. तो रेस्टॉरंटचा मालकही आहे.

नागार्जुन एका चित्रपटासाठी २० कोटी एवढे पैसे घेतो. तर विविध ब्रँड्समधून तो कोट्यवधी रुपये कमावतो. तसंच तो तेलुगू बिग बॉसचे सिझनही होस्ट करतो. यासाठी तो १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. तर टीव्हीवरील एखाद्या शोसाठी तो ५ कोटी आकारतो.

नागार्जुनचा हैदराबादच्या ज्युबिली हिल्स सारख्या पॉश एरियात ४० कोटींचा बंगला आहे. त्याची स्वत:ची अन्नपूर्णा स्टुडिओ ही प्रोडक्शन कंपनी आहे. हा स्टु़डिओ ७ एकर्समध्ये पसरला आहे. याशिवाय तो अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिल्म अँड मीडिया, हैदराबादचा अध्यक्ष आहे.

तसंच हैदराबादला N GRILL हे त्याचे स्वत:चे रेस्टॉरंट आहे. शिवाय N ASIAN हे चायनीज रेस्टॉरंटही आहे. कॉर्पोरेट हाऊसेसचे इव्हेंट जिथे होतात असे एन कन्वेशन सेंटरही आहे. २०१२-१३ च्या फोर्ब्स लिस्टमध्येही त्याने टॉप 100 मध्ये 56 वे स्थान मिळवले होते.

नागार्जुनला कारची प्रचंड आवड आहे. बेंटले, बीएमडब्ल्यू, रेंज रोवर, रोल्स रॉयस आणि पोर्शे सारख्या अनेक महागड्या कारही आहेत.