1,350 कोटींचा मालक, अगदी साधं राहणीमान; मातीशी घट्ट जोडलेला हा स्टारकिड कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:15 PM2023-12-14T12:15:34+5:302023-12-14T12:27:43+5:30

स्टार किड्स हे कायमच चर्चेत असतात. पण काही स्टार किड्स असे असतात जे आपल्या गुणांनी सर्वांचे मन जिंकतात.

सध्या काही स्टार किड्स हे मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. तर काहींची फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री होणार आहे. पण, आपल्या पालकांप्रमाणे स्टारडम मिळवण्यात अनेक स्टार किड्स अपयशी राहिले. यात अभिषेक बच्चन, तुषार कपूर, उदय चोप्रा यांचा समावेश आहे. पण, आज आपण एका अशा स्टारकिड बद्दल जाणून घेणार आहोत. जो ब्लॉकबास्टर चित्रपट देऊन आणि अमाप संपत्ती असून मातीशी जोडलेला आहे.

तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुपरस्टार राम चरण आहे. ज्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. फक्त अभिनेताच नाही तर तो एक निर्माता आणि उद्योजक देखील आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या कलाकारांपैकी एक असलेल्या राम चरणचा फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 यादीत 2013 पासून समावेश केला जातो. त्याने तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन नंदी पुरस्कार जिंकले आहेत.

राम चरणने त्याच्या अभिनयाची सुरुवात चिरुथा (2007) या फिल्मद्वारे केली. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा आणि साऊथचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर एस.एस. राजामौली यांच्या मगधीरा (2009) द्वारे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ज्याने सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता.

राम चरणच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये ऋचा (2012), नायक (2013), येवडू (2014), गोविंदुडु अंडारिवाडेले (2014), ध्रुव (2016) यांचा समावेश आहे. त्यानंतर राम चरणने ब्लॉकबस्टर रंगस्थलम (2018) मध्ये अभिनय केला. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

तर राम चरणच्या RRR (2022) सिनेमाने 1,387 कोटींहून अधिक कमाई केली आणि त्याचा हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. तर राम चरणला यासाठी फिल्मफेअर हा पुरस्कार मिळाला.

अभिनयाव्यतिरिक्त राम चरण कोनिडेला प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. पोलो टीम हैदराबाद पोलो आणि रायडिंग क्लबचाही तो मालक आहे. तर प्रादेशिक विमान सेवा ट्रूजेटचा तो सह-मालक आहे.

चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण हा भारतातील सर्वात श्रीमंत 'स्टार किड' आहे. राम चरणचे उत्पन्न हे त्याचे वडील चिरंजीवी यांच्या बरोबरीने आहे. चिरंजीवी यांची एकूण संपत्ती रु. 1,650 कोटी ($200 दशलक्ष) आहे.

राम चरणकडे खाजगी जेट आणि लक्झरी कारही आहेत. त्याने ही सर्व संपत्ती स्वबळावर कमवली आहे. एवढ्या कोटींचा मालक असूनही तो अतिशय साधे जीवन जगतो आणि त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो.

रिपोर्टनुसार, 750 कोटींच्या एकूण संपत्तीसह हृतिक रोशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आलिया भट्ट ही 520 कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर करीना कपूर 485 कोटी आणि ज्युनियर एनटीआर 450 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. रणबीर कपूर 365 कोटींचा मालक आहे, तर प्रभास आणि अभिषेक बच्चन यांच्याकडे 240 कोटी आणि 170 कोटींची संपत्ती आहे. तर राम चरणची एकूण संपत्ती ही 1350 कोटी रुपये आहे.