रिलीजच्या अवघ्या २४ तासांतच ओटीटीवर प्रदर्शित; प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय 'हा' चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:57 IST2025-07-22T17:43:53+5:302025-07-22T17:57:40+5:30
आयएमडीबीवर तर या चित्रपटाला १० पैकी ७.८ असं चांगलं रेटिंग मिळालं आहे.

Best Psychological Thriller 2025: चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यांनी चित्रपट ओटीटीवर येतो, हे आता नेहमीचंच झालं आहे. पण याला अपवाद ठरला आहे एक खास चित्रपट.
जो रिलीजच्या अवघ्या २४ तासांच्या आतच थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, दमदार कथेमुळे हा चित्रपट सध्या प्रचंड ट्रेंड करत आहे. अनेकांनी याला "must-watch" म्हटलंय. आयएमडीबीवर तर या चित्रपटाला १० पैकी ७.८ असं चांगलं रेटिंग मिळालं आहे.
हा एक तामिळ चित्रपट असून तो जिओ हॉटस्टारवर तेलुगु, हिंदी, कन्नड आणि मल्याळम यांसारख्या अनेक भाषांमध्ये उपलब्ध झाला आहे.
या चित्रपटाचं नाव आहे 'डीएनए'. २० जून २०२५ रोजी तामिळनाडूमध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
त्यानंतर या चित्रपटाला तेलुगूमध्ये My Baby नावाने १८ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आलं. तेलुगूमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या २४ तासांत म्हणजेच १९ जुलै रोजी 'डीएनए'ला ओटीटीवर स्ट्रीम करण्यात आलं.
या थ्रिलर चित्रपटात अथर्वा मुरली आणि निमिशा सजयान मुख्य भूमिकेत आहेत. तर नेल्सन वेंकटेशन यांंनी दिग्दर्शन आहे.
'डीएनए' चित्रपटाटी कथा भावनिक आणि थरारक आहे. हा अशा चित्रपटांपैकी एक आहे, जो तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
ही कथा अशा दोन व्यक्तींची आहे, जे आपापल्या भूतकाळाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. आनंद हे असं पात्र आहे, जे वेदनादायक ब्रेकअपमधून गेलय. नशेच्या आहारी गेल्यानं त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तर दुसरीकडे बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर आजारानं त्रस्त असेलली दिव्या आधीपासूनच आपल्या कुटुंबासाठी एक 'ओझं' ठरली आहे.
चित्रपटाच्या कथेत खऱ्या अर्थाने थरारक वळण येतं तेव्हा, जेव्हा दिव्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. तिला खात्री असते की तिच्या हातात दिलेलं बाळ हे तिचंच नाही. यानंतर आनंद खरं बाळ शोधण्यासाठी निघतो. जसजशी ही कथा पुढे सरकते, तसतसा रहस्य, तणाव आणि भावनिक थरार वाढत जातो.