अप्सरेच्या घायाळ करणाऱ्या अदा, सोशल मीडियावर फोटोंचा धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 05:36 PM2023-09-15T17:36:29+5:302023-09-15T17:44:24+5:30

सोनाली कुलकर्णी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसूनही सोनालीनं मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

'नटरंग' सिनेमातील अप्सरा आली या गाण्यामुळे सोनाली विशेष लोकप्रिय झाली. आज सोनाली महाराष्ट्राची अप्सरा या नावानेही ओळखली जाते.

सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

सोनाली कायम नवनवीन फोटोशूट करुन चर्चेत येत असते. यातील काही फोटो ती चाहत्यांसोबतही शेअर करते.

सध्या नेटकऱ्यांमध्ये सोनालीचं असंच एक फोटोशूट चर्चेत आलं आहे. सोनालीने पींक कलरमध्ये फोटोशूट केलं आहे.

सोनाली या फोटोमध्ये प्रचंड सुंदर दिसत असून तिने गळ्यातील नेकलेस तिची शोभा आणखी वाढवत आहेत.

तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने साकारलेली बकुळा प्रेक्षकांना खूपच भावली होती. या सिनेमाच्या निमित्तानं तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली.

सोनालीनं आतापर्यंत अनेक सिनेमांत काम केलं आहे. त्यात गाढवाचं लग्न, गोष्ट लग्नाची, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, ,पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, हिरकणी, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.

सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. अभिनयाबरोबच सोनाली उद्योजिका देखील झाली आहे.