वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 14:12 IST2024-07-19T14:03:46+5:302024-07-19T14:12:18+5:30

क्युट बबली गर्ल श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' मुळे चर्चेत आहे. तिचे या लूकमधले Photos पाहिले का?

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) बॉलिवूडमध्ये क्युट , बबली गर्ल म्हणून लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तर श्रद्धाची हवा असते. चाहत्यांच्या कमेंट्सला ती वैयक्तिकरित्या उत्तरं देत असल्याने ती नेटकऱ्यांची प्रचंड लाडकी आहे.

श्रद्धा दर रविवारी तिचे काही सेल्फीही पोस्ट करते. तसंच ती प्रचंड foodie असल्याने वेगवेगळ्या पदार्थांचे फोटोही शेअर करत असते. तसंच तिच्या महाराष्ट्रीयन लूकवर तर चाहते फिदा असतात.

सध्या श्रद्धा चर्चेत आहे ती आगामी 'स्त्री 2' सिनेमामुळे. 2018 साली आलेला राजकुमार राव आणि श्रद्धाचा 'स्त्री' प्रचंड गाजला. आता ६ वर्षांनी त्याचा सीक्वेल येतोय. यामध्ये श्रद्धाचा लूक प्रेक्षकांना आवडला आहे.

कालच 'स्त्री 2' ट्रेलर लाँच पार पडला. यानिमित्त श्रद्धा मुंबईतील एका मॉलमध्ये आली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी वेड्यासारखी गर्दी केली होती.

ट्रेलर लाँचवेळी श्रद्धाने जो लूक केला होता त्याचे फोटो तिने आता पोस्ट केलेत. लाल साडी, लांब वेणी, आकर्षक ज्वेलरी घालून श्रद्धा सुंदर नटलेली दिसत आहे. तिचा 'स्त्री'लूक पाहून प्रेक्षकांची तिच्यावरुन नजरच हटत नाहीए.

चंदेरी गावावर 'सरकटे'चं संकट आलं आहे. त्यापासून गावकऱ्यांना वाचवण्यासाठी स्त्री परत आली आहे. 'ओ स्त्री रक्षा करना'असं गावातले लोक म्हणत आहेत. स्त्रीच्या या लांब वेणीमध्ये मोठी ताकद असल्याचं श्रद्धा म्हणाली.

ट्रेलरमध्येही स्त्री आणि सरकटे आमने सामने आलेले पाहायला मिळतात. तसंच श्रद्धा आणि राजकुमार रावची रोमँटिक कॉमेडी केमिस्ट्रीही बघायला मजा येणार आहे.