सलमानच्या सावलीप्रमाणे वावरणारा शेरा आहे कोटयधीश; वर्षाला घेतो इतक्या कोटींचं पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 13:03 IST2022-06-12T12:45:45+5:302022-06-12T13:03:45+5:30

Salman khan: सलमानला सुरक्षा पुरवण्याच्या बदल्यात शेरा गलेलठ्ठ पगार घेतो.

बॉलिवूड कलाकारांसह अनेकदा त्यांच्या कुटुंबीयांची वा त्यांच्या आसपास असणाऱ्या जवळच्या व्यक्तींची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. यातलंच एक नाव म्हणजे सलमान खान.

अभिनेता सलमान खानसोबत त्याचे कुटुंबीय आणि बॉडीगार्ड शेरा कायम चर्चेत असतात.

सलमानच्या कुटुंबीयांविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे आज त्याच्या बॉडीगार्ड शेराविषय़ी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

गेल्या कित्येक वर्षांपासून शेरा, सलमानकडे काम करत असून सलमान त्याला सख्खा भावाप्रमाणे वागणूक देतो.

शेरा, सलमानचा अत्यंत विश्वासू आणि जूना बॉडीगार्ड असून आज तोही एक सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो.

शेरा सलमानचा बॉडीगार्ड असण्यासोबतच तो १९८७ मध्ये मिस्टर मुंबई ज्युनिअर आणि १९८८ मध्ये मिस्टर महाराष्ट्र ज्युनिअर सेकंड रनर अप राहिला आहे.

शेराने सलमानसह मायकल जॅक्सन, विल स्मिथ, जॅकी चॅन यांनाही सिक्युरिटी पुरवली आहे.

शेरा सलमानचा अत्यंत विश्वासू असल्यामुळे भाईजान त्याच्याकडे खास लक्ष देतो.

सलमानला सुरक्षा पुरवण्याच्या बदल्यात शेरा गलेलठ्ठ पगार घेतो.

शेराला वर्षाला २ कोटी रुपयांचा पॅकेज असून तो महिन्याला लाखो रुपये कमावतो.

शेराची स्वत:ची एक सुरक्षा एन्जसी आहे. या एन्जसी अंतर्गत तो अनेक दिग्गज व्यक्तींना सुरक्षा पुरवतो.