सैफ अली खानने ब्लेझरवर लावला चिमुकला पक्षी; पण किंमत आहे भलीमोठी, वाचून थक्कच व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:41 IST2026-02-09T15:26:19+5:302026-02-09T15:41:43+5:30

साधे पांढरे कुर्ते-पायजमे पसंत करणारा सैफ अली खान नुकताच एका अशा रूपात दिसला की सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. सैफच्या कपड्यांपेक्षा त्याच्या जॅकेटवर लावलेल्या एका छोट्याशा 'ब्रोच'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

बॉलीवूडचा 'नवाब' सैफ अली खान आपल्या शाही जीवनशैलीसाठी आणि फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असतो. साधे पांढरे कुर्ते-पायजमे पसंत करणारा सैफ अली खान नुकताच एका अशा रूपात दिसला की सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.

व्हॅलेंटाईन डेच्या आधी सैफ आणि करीना कपूर मुंबईतील एका प्रसिद्ध शोरूमच्या बाहेर दिसले. मात्र, यावेळी सैफच्या कपड्यांपेक्षा त्याच्या जॅकेटवर लावलेल्या एका छोट्याशा 'ब्रोच'ने (Brooch) सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सैफ अली खानचा हा ब्रोच इतका महाग आहे की त्याच्या किमतीत तुम्ही एक आलिशान लक्झरी कार खरेदी करू शकता. जाणून घ्या.

सैफ अली खानचा हा ब्रोच हा साधासुधा नसून तो 'टिफनी अँड कंपनी' (Tiffany & Co.) या जगप्रसिद्ध ब्रँडच्या 'जीन श्लमबर्गर' कलेक्शनमधील एक उत्कृष्ट नमुना आहे.

रिपोर्टनुसार, या ब्रोचची किंमत तब्बल ४७,००० डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे ४२.४ लाख रुपये इतकी आहे. एका छोट्याशा दागिन्याची एवढी किंमत पाहून फॅशन जगतात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हा ब्रोच १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आला असून यात पिवळे सोने आणि प्लॅटिनमचा वापर करण्यात आला आहे. पक्ष्याच्या आकारात असलेल्या या ब्रोचमध्ये मौल्यवान रत्ने जडलेली आहेत

या ब्रोचचं वैशिष्ट्य म्हणजे यात ७१ गोल हिरे असून पक्ष्याचे डोळे लाल रंगाच्या माणकापासून तयार करण्यात आले आहेत. या संपूर्ण ब्रोचचे वजन साधारण ४०.३ ग्रॅम आहे. अशाप्रकारे आकाराने छोटा असूनही सैफच्या या ब्रोचची किंमत लाखोंच्या घरात आहे.