पाहा, ‘रोडिज’ फेम रघुरामच्या हनीमूनचे फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:50 IST2019-01-31T14:45:44+5:302019-01-31T14:50:58+5:30

एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज’चा माजी परिक्षक रघुराम सध्या त्याची बेटरहाफ नताली डि लुसियोसोबत गोव्यात हनीमून साजरा करतोय. या हनीमूनचे फोटो रघुरामने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गतवर्षी डिसेंबरमध्ये गोव्यात एका पारंपरिक सोहळ्यात रघुराम व नतालीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या होत्या. हे रघुरामचे दुसरे लग्न आहे.

गतवर्षी रघुरामने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर काही महिन्यांतच रघुरामने त्याचे व नतालीचे नाते जगजाहिर केले. यानंतर नतालीसोबत साखरपुडा केला.

यानंतर डिसेंबर महिन्यात नतालीसोबत लग्नगाठ बांधली. ख्रिश्चन व साऊथ इंडियन अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.

२०१६ मध्ये नताली डि लुसियो आणि रघु ‘आंखो ही आंखो में’ या गाण्यानिमित्त एकत्र आलेत आणि पुढे एकमेकांत गुंतले. यानंतर रघुने पत्नी सुगंधासोबत घटस्फोट घेतला आणि नेटलीसोबतचे नाते जगजाहिर केले.

काही वर्षाआधी तू माज्या आयुष्यात आली आणि माझा मी मला परत मिळालो. तुज्यासोबत मी प्रेम अनुभवले, आनंद अनुभवला. तू माज्या आयुष्यात आशा बनून आलीस. आय लव्ह यू..., अशी एक अतिशय भावूक पोस्ट रघुने लिहिली होती.


















