Tripti Dimri : 'कला' फेम अभिनेत्री 'तृप्ती डिमरी'चा हॉट लुक; ओळखणेही झाले कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 04:08 PM2022-12-13T16:08:37+5:302022-12-13T16:26:41+5:30

नेटफ्लिक्स फिल्म 'कला' मध्ये पॉवरफुल परफॉरमन्स देणाऱ्या अभिनेत्री तृप्ती डिमरीची सध्या जोरदार चर्चा आहे. गोड अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हिमाचलची मुलगी तृप्ती हिचा कला हा पहिलाच सिनेमा नाही. जाणून घ्या तृप्तीबद्दल खास गोष्टी

आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित कला या सिनेमाचे खुप कौतुक होत आहे. यातला मुख्य चेहरा अभिनेत्री तृप्ती डिमरीवर चाहते घायाळ झालेत.

कला मध्ये साधी, भोळी दिसणारी तृप्ती खऱ्या आयुष्यात खुपच ग्लॅमरस आहे.

तृप्ती हिमाचलची असून २०१७ मध्ये आलेल्या पोस्टर बॉइज सिनेमातून तिने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. यानंतर २०२० मध्ये ती बुलबुल सिनेमातही झळकली.

कला या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला आज वेगळी ओळख मिळाली आहे. याआधी तिने साजिद खानच्या लैला मजनू चित्रपटातही भुमिका केली आहे.

तृप्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने अनेक फोटो पोस्ट केले आहेत ज्याला आता चाहत्यांची पसंती मिळत आहे.

तृप्ती लवकरच विकी कौशल सोबत आगामी सिनेमात झळकणार आहे. त्याचे शुटिंग क्रोएशिया मध्ये झाले असून तृप्ती आणि विकी मध्ये रोमॅन्टिक गाणे शूट करण्यात आले आहे.

तसेच तृप्तीची रणबीर कपुरच्या आगामी 'अॅनिमल' सिनेमातही वर्णी लागली आहे.

'बुलबुल' सिनेमासाठी तृप्तीला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्डही मिळाला आहे.