आई तशी मुलगी! प्रतिक्षा लोणकर यांच्या लेकीचं निरागस सौंदर्य, नावही आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:03 IST2025-07-11T14:47:58+5:302025-07-11T15:03:36+5:30
आईसारखंच निरागस सौंदर्य, प्रतिक्षा लोणकर यांच्या लेकीला पाहिलंत का?

प्रतिक्षा लोणकर (Pratiksha Lonkar) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा. १९९७ साली आलेल्या 'दामिनी' मालिकेतील भूमिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.
प्रतिक्षा लोणकर या मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या आहेत. अभिनयातील करिअरसाठी त्या मुंबईत आल्या आणि कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं.
मराठी रंगभूमीवरुन त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'अर्थ' हे त्यांचं मराठी नाटक आजही अनेक प्रेक्षकांच्या मनाच्या कोपऱ्यात आहे. सौ. कुमूद प्रभाकर आपटे हेही आणखी एक अफलातून नाटक.
प्रतिक्षा लोणकर यांनी मराठी, हिंदी सिनेमेही गाजवले. 'इकबाल', 'एवढेसे आभाळ', 'आशायें', 'मोकळा श्वास' यासह अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं.
प्रतिक्षा लोणकर यांनी १९९० साली लेखक, नाटककार प्रशांत दळवी यांच्याशी लग्नगाठ बांधली. दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर होतं.
त्यांना एक मुलगी आहे. रुंची असं तिचं नाव आहे. आईप्रमाणेच रुंजीही दिसायला निरागस, सुंदर आहे.
प्रतिक्षा यांनी लेकीसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. यामध्ये रुंजीने लक्ष वेधून घेतलं आहे.