अभिराम जहागीरदारांच्या 'लीला'ची बातच न्यारी! पैठणी साडी नेसून केलं सुंदर फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 16:47 IST2024-08-21T16:37:55+5:302024-08-21T16:47:34+5:30
'नवरी मिळे हिटलर'ला फेम अभिनेत्री वल्लरी विराज अल्पवधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली.

या मालिकेत वल्लरी अभिनेता राकेश बापटसोबत स्क्रीन शेअर करत आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. मालिकेत अभिनेत्रीने 'लीला' नावाचं पात्र साकारलं आहे.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पैठणी नेसून सुंदर असे फोटो शेअर केले आहेत.
पिस्ता कलरची पैठणी साडी, गळ्यात मोत्याची ठुशी असा साज अभिनेत्रीने केला आहे.
वल्लरी या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
वल्लरीने अनेक ऐतिहासिक तसेच पौराणिक मालिकांमध्ये काम करून मालिकाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या मालिकेत तिने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती.
शिवाय 'कन्नी' या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे.