मुलगी झाली हो: माऊचा भाऊ खऱ्या आयुष्यात आहे 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा लेक; 'हिमालयाची सावली'चं केलंय त्यांनी दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:09 IST2022-04-12T15:04:32+5:302022-04-12T15:09:08+5:30
Srujan deshpande: खऱ्या आयुष्यात प्रचंड साध्या पद्धतीने राहणारा सृजन एका प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शकाचा लेक आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मुलगी झाली हो.
ही मालिका मध्यंतरी अनेक वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आली होती.
उत्तम कथानकासह या मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकप्रिय होत आहे. त्यातलाच एक कलाकार म्हणजे माऊचा भाऊ.
या मालिकेत अभिनेता सृजन देशपांडे याने माऊच्या भावाची म्हणजेच रोहन पाटील ही भूमिका साकारली आहे.
खऱ्या आयुष्यात प्रचंड साध्या पद्धतीने राहणारा सृजन एका प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शकाचा लेक आहे.
सृजन याच्या कुटुंबातील अनेक जण कलाविश्वाशी संबंधित आहेत. त्याचे वडील दिग्दर्शक, अभिनेता आहेत. तर, काका रोहन देशपांडे हे उत्तम लेखक, दिग्दर्शक, संकलक आहेत.
सृजनच्या वडिलांचं नाव राजेश देशपांडे असं आहे.
राजेश देशपांडे यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
'पुढचं पाऊल', 'कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक', करून गेलो गाव', 'हिमालयाची सावली', 'धुडगूस', 'धनंजय माने इथेच राहतात' अशा अनेक नाटक, मालिकांमध्ये त्यांनी अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.