मराठमोळी थोडीशी साधीभोळी! मृणाल ठाकूरच्या महाराष्ट्रीयन लूकवरुन चाहत्यांची नजरच हटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:01 IST2025-12-14T13:42:39+5:302025-12-14T17:01:32+5:30
मूळची धुळ्याची मृणाल म्हणते, 'मी पूर्ण मराठी...'

हिंदी आणि साउथमध्ये आघाडीवर असलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर. मृणालने नुकत्याच शेअर केलेल्या मराठमोळ्या लूकवरुन अनेकांची नजरच हटत नाहीये.

अस्सल महाराष्ट्रीयन लूक म्हटलं की साडी आलीच. मृणालने हिरव्या रंगाची ही जरतारी पैठणी नेसली आहे. साडीला लाल-केशरी रंगाची काठ आहे. मॅचिंग डिझायनर ब्लाऊज आहे.

मृणालने ही साडी अगदी मराठमोळ्या अंदाजात स्टाईल केली आहे. गळ्यात सुंदर हार घातला आहे. इअररिंग्स आणि साजेशा बांगड्याही आहेत. महत्वाचं म्हणजे तिने एक छानशी नथही घातली आहे.

कपाळी चंद्रकोर, केसात गजराही माळला आहे. तिच्या ब्लाऊजची जिझाऊन तर कमाल दिसत आहे. या लूकमध्ये मृणालचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.

या गोड लूकमध्ये मृणालने एकापेक्षा एक पोज देत लक्ष वेधून घेतलं आहे. 'थोडी मॉडर्न...पूर्ण मराठी' असं खास कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

तिचे हे फोटो पाहून एका चाहत्याने तर तिला थेट लग्नासाठीच मागणी घातली आहे. 'लग्न कधी करायचं मग?' अशी कमेंट त्याने केली आहे.

लग्नाच्या या सीझनमध्ये मृणाल कुटुंबासोबत छान तयार झाली आहे. तिने आईवडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही फोटो शेअर केला आहे.

















