तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती...! मृणाल ठाकूरने शेअर केले बोल्ड फोटो, झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:14 IST2021-08-25T17:09:17+5:302021-08-25T17:14:58+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. कारण आहे तिचे बोल्ड फोटो.

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. कारण आहे तिचे बोल्ड फोटो.
होय, नुकतेच मृणालने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि हे फोटो पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
या फोटोमध्ये मृणालने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. मृणाल खाली बसली असून ती पोज देताना दिसत आहे.
मृणालचे हे बोल्ड फोटो काही नेटक-यांना आवडले नाहीत. मग काय, ती ट्रोल झाली. मग तुझ्यात आणि इतर अभिनेत्रींमध्ये काहीच फरक राहणार नाही, असे एका युजरने लिहिले.
तू ठाकूर आहेस अशी अपेक्षा तुझ्याकडून नव्हती,मृणाल आत्ता हे अति होतंय,अशा कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले.
मुझसे कुछ कहती है खामोशियां या मालिकेतून मृणालने टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते.
यानंतर ती बºयाच मालिकांमध्ये दिसली आणि यानंतर चित्रपटांकडे वळली.
‘सुपर ३०’ या चित्रपटातून मृणालने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अलीकडे फरहान अख्तरच्या ‘तुफान’ या सिनेमात ती झळकली.
लवकरच ती शाहिद कपूरसोबत ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. साऊथचे तिचे काही सिनेमेही प्रदर्शित होणार आहेत.