मराठमोळी थोडीशी साधीभोळी... पैठणी साडीत खुललं मिताली मयेकरचं सौंदर्य! पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:36 IST2025-01-24T13:25:12+5:302025-01-24T13:36:33+5:30

मिताली मयेकर हिनं पैठणी साडीत केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर (Mitali Mayekar).

उत्तम अभिनयासह तिच्या फॅशन सेन्ससाठी मिताली लोकप्रिय आहे. वेस्टर्न असो वा देसी प्रत्येक लूकमध्ये ती सुंदरच दिसते.

आताही मितालीनं मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. जे आता व्हायरल होत आहेत.

मितालीनं पैठणी परिधान केली आहे. त्यावर नाकात नथ, चंद्रकोर आणि पारंपरिक दागिणे परिधान केले आहेत.

तिच्या या मराठमोळ्या साजावर चाहते देखील भाळले आहेत.

लाइट टोन मेकअप आणि सुंदर हेअरस्टाइलमध्ये ही अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते आहे. तिनं केसांमध्ये गजरा देखील माळला आहे.

यामुळे तिचा पारंपरिक अवतार अधिक खुलून दिसतोय. 'फसक्लास दाभाडे' या सिनेमाच्या प्रिमियरसाठी तिनं ही खास साडी नेसली होती.

मितालीचा 'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तिनं पती सिद्धार्थ चांदेकरसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली आहे.

खास बाब म्हणजे आज सिद्धार्थ आणि मिताली यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

सिद्धार्थ आणि मिताली यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर 'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या निमित्ताने त्यांची इच्छा पुर्ण झाली आहे.