Maria Sharapova welcomes baby boy: सौंदर्यवती माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हा झाली आई; मुलाचं नाव ठेवलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 05:12 PM2022-07-16T17:12:16+5:302022-07-16T17:18:04+5:30

सोशल मीडियावर मुलाचा फोटो शेअर करत दिली गोड बातमी

Maria Sharapova welcomes first baby: टेनिस स्टार आणि एकेकाळची नंबर वन टेनिसपटू मारिया शारापोव्हाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मारियाने २० एप्रिलला आपल्या वाढदिवशी प्रेग्नंसीची घोषणा केली होती.

मारिया आणि तिचा प्रियकर (Fiance) ब्रिटिश व्यावसायिक अलेक्झांडर गिल्क्स यांनी आपल्या पहिल्या बाळाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत साऱ्यांना गोड बातमी सांगितली.

मारियाने इन्स्टाग्रामवर एका बीचवर उभी राहून असलेला एक फोटो पोस्ट केला होता. त्यात बेबी बंप दाखवत तिने प्रेग्नंसीची घोषणा केली होती. 'अप्रतिम नवी सुरुवात!!! दोन जीवांसाठी वाढदिवसाचा केक खाणे हे माझ्यासाठी नेहमीच खास असेल', असेही तिने लिहिले होते.

त्यानंतर आता मारियाने आपल्या इन्स्टाग्रामवरून मुलाचा फोटो शेअर केला आहे. याच पोस्टमध्ये तिने मुलाच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

शारापोवा आणि अलेक्झांडर यांनी आपल्या मुलाचे नाव थियोडोर ( Theodore ) ठेवलं आहे. याच पोस्टमध्ये तिने आपल्या मुलाची जन्म तारीख खास पद्धतीने म्हणजेच रोमन अंकांमध्ये लिहिली आहे.

मारिया शारापोव्हाने डिसेंबर २०२० मध्ये ब्रिटिश व्यावसायिक अलेक्झांडर गिल्क्स याच्याशी साखरपुडा केला होता. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये तिने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती.