'लागिरं झालं जी' मधील आज्याची शितली आठवतेय? आता दिसते फारच सुंदर,'या' मालिकेत करतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 18:26 IST2026-01-18T18:05:46+5:302026-01-18T18:26:04+5:30

'लागिरं झालं जी'मधील आज्याची साधीसुधी शितली दिसते पहिल्यापेक्षा फारच सुंदर, आता काय करते माहितीये?

"लय असत्याल मनमौजीस लाखात एक माझा फौजी...",डायलॉग कानावर पडताच लागिरं झालं जी या मालिकेचं नाव पटकन आठवतं.

२०१७ मध्ये आलेल्या मालिकेनं जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील अजय आणि शितलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.

या मालिकेतील भैय्यासाहेब, विक्या, राहुल्या, जयडी तसेच विक्रम आणि जीजी ही पात्रे देखील खूप गाजली.

दरम्यान, या मालिकेत शितली म्हणजेच शितलचं पात्रं अभिनेत्री शिवानी बावकरने साकारलं होतं.या पात्राला तिने एका वेगळ्याच उंचीवर नेलं होतं.

आजही 'लागिरं झालं जी'मालिकेचं कोणी नाव काढलं तर लगेच शिवानीचा चेहरा डोळ्यांसमोर येतो.

या मालिकेने निरोप घेतला असला तरी शिवानी बावकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. लागिरं झालं जी मधील पंजाबी ड्रेसमधील आज्याची साधीसुधी शितली आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

शिवानी आता स्टार प्रवाह वाहिनीवर 'साधी माणसं' मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसते आहे. या मालिकेत ती मीरा नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे.