'बाई मी लाजाळू गं...' प्रियदर्शनीच्या हटके पोज, नव्या लूकची इंटरनेटवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:31 IST2024-04-17T16:25:21+5:302024-04-17T16:31:02+5:30

प्रियदर्शनी इंदलकर हे नाव अल्पावधीतच महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.

पुण्याची विनम्र अभिनेत्री असा टॅग तिला या शोमुळे मिळाला.

सध्या प्रियदर्शनी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

अलिकडेच तिनं निळ्या रंगाची कॉटन साडी परिधान करून एक फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.

या फोटोंमध्ये नाकात नथ, केसांचा अंबाडा तसेच कॉटनच्या साडीवर ऑफ शोल्डर ब्लाऊज तिने घातल्याचं दिसतंय.

'प्रेम' असं एक वाक्याचं कॅप्शन प्रियदर्शनीने या फोटोंना दिलंय.

प्रियदर्शनीच्या या फोटोंवर एका चाहत्याने '' इतने दिन कली को देख रहा था, आज फुल को देख रहा हुं'' अशी कमेंट केली आहे.