"मन जुळली, स्वप्नं फुलली...", 'आई कुठे...' फेम कौमुदी वलोकरने शेअर केले लग्नातील खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:16 IST2024-12-26T16:05:20+5:302024-12-26T16:16:14+5:30
'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

कौमुदीने आकाश चौकसेसोबत लग्न करून आपल्या नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे.
सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल चर्चा होत्या. मात्र, आज ती लग्नबेडीत अडकली आहे.
कौमुदी ही 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने आरोही नावाची व्यक्तिरेखा साकारली.
दरम्यान, सोशल मीडियावर नुकतेच कौमुदीने तिच्या लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
"मन जुळली, स्वप्नं फुलली, आणि आता एक नवीन प्रवास सुरू..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
लग्नासाठी कौमुदीने आकाशी रंगाची नऊवारी साडी त्यावर गुलाबी शेला अन् ब्लाऊज परिधान केलाय. सोबतच त्यावर साजेसे पारंपरिक दागिने, असा मराठमोळा लूक अभिनेत्रीने केला आहे.
शिवाय आकाशने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा आणि त्यावर निळ्या रंगाचा शेला घेऊन लग्नात मॅचिंग लूक केला.