Photos: मराठी टीव्ही 'स्टार' कपलचं सुंदर प्री वेडिंग फोटोशूट, लवकरच बोहल्यावर चढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:03 IST2025-01-18T08:55:21+5:302025-01-18T09:03:03+5:30
टीव्ही मालिकांमध्ये दिसलेलं हे कपल आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

सध्या टीव्ही मनोरंजनविश्वात अनेकांची लग्नाची लगबग सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच रेश्मा शिंदेने थाटात लग्नगाठ बांधली. शिवाय अभिनेत्री कौमुदी वालोकरचंही नुकतंच लग्न झालं
तर आता आणखी एक मराठमोळं कपल लग्नाच्या बेडीत अडकत आहे. त्यांच्या प्री वेडिंगचे फोटोही समोर आले आहेत. यामध्ये दोघंही खूपच गोड दिसत आहेत.
हे कपल 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar)आणि 'रंग माझा वेगळा' फेम अंबर गणपुळे (Ambar Ganpule) लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.
शिवानी आणि अंबरच्या घरी तयारीला सुरुवात झाली आहे. त्यांच्या सोशल मीडियावर ते सतत याविषयी अपडेट देत असतात.
आता त्यांनी आपलं प्री वेडिंग फोटोशूट नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. बेबी पिंक रंगाच्या साडीत शिवानी खूपच सुंदर दिसत आहे तर अंबरने गुलाबी रंगाचाच शर्ट घातला आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात एकमेकांचा हात हातात घेऊन त्यांनी केलेलं हे फोटोशूट लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी याचा व्हिडिओही अकाऊंटवर शेअर केला आहे.
गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली.
शिवानी नुकतीच 'तू भेटशी नव्याने' मालिकेत दिसली. तर अंबर 'दुर्गा' या मालिकेत दिसला.