Vedat Marathe Veer Daudale Saat : वेडात मराठे वीर दौडले सात...! कोण आहेत ते सात वीर मराठे? पाहा फर्स्ट लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 11:27 IST2022-11-03T10:58:59+5:302022-11-03T11:27:39+5:30

Vedat Marathe Veer Daudale Saat : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात वीरांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्या सात वीरांचा पहिला लुक समोर आला आहे.

महेश मांजरेकर यांचा नवा सिनेमा येतोय आणि या सिनेमाची घोषणा होताच सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असं या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपट खास आहे कारण हा मांजरेकरांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बिग बजेट सिनेमा आहे. शिवाय या चित्रपटातून अक्षय कुमारचा मराठी डेब्यू होतोय.

महेश मांजरेकरांचा हा आतापर्यंतचा बिग बजेट सिनेमा आहे. चित्रपटात बॉलिवूडचा हिरो अक्षय कुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. हे वाचून अक्षयचे फॅन्स क्रेझी झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात वीरांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्या सात वीरांचा पहिला लुक समोर आला आहे. प्रतापराव गुजर यांची भूमिका अभिनेते प्रवीण तरडे जिवंत करणार आहेत.

सूर्याजी दांडकर यांची भूमिका अभिनेता उत्कर्ष शिंदे वठवणार आहे

अभिनेता हार्दीक जोशी या चित्रपटात मल्हारी लोखंडे साकारणार आहे.

‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता अभिनेता विशाल निकम चंद्राजी कोठार यांची भूमिका साकारणार आहे.

अभिनेता विराट मडके हा जिवाजी पाटील ही भूमिका साकारणार आहे.

‘बिग बॉस मराठी 3’ फेम जय दुधाणे देखील सिनेमात असून तुळजा जामकर यांची भूमिकेत दिसणार आहे.

महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर सिनेमात दत्ताजी पागे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.