"माय रोमान्स विथ माय...." वैदेही परशुरामीच्या कॅप्शननं वेधलं लक्ष, पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:00 IST2025-08-24T12:43:53+5:302025-08-24T13:00:30+5:30

वैदेही परशुरामीची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami).

वैदेही परशुरामीचे अनेक चाहते आहेत. वैदेही तिच्या सौंदर्यामुळे आणि गोड हसण्याने अनेकांना प्रेमात पाडते.

पण, वैदही कुणासोबत रोमान्स करतेय माहितेय का? नुकतंच तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितलं.

वैदेहीनं तिच्या सेल्फी कॅमेऱ्यातील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना तिनं दिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं.

"My Romance With My Selfie Camera!" असं मजेशीर कॅप्शन देत फोटो शेअर केलेत.

सेल्फी कॅमेऱ्यातून काढलेल्या तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींना प्रेमाचा वर्षाव केलाय.

वैदेहीच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास, हास्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

या फोटोत वैदहीनं लाल टोपी, निळा टी-शर्ट व ब्लॅक पॅन्ट असा पेहराव केल्याचं दिसतंय. तिचा हा लूक सिंपल पण प्रचंड सुंदर दिसतोय.

वैदेहीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'सिंबा', 'इंडियन पोलीस फोर्स' अशा कलाकृतींमधून वैदेहीने बॉलिवूडमध्येही स्वतःची छाप पाडली आहे.

अलिकडेच वैदेही परशुरामीचा सुबोध भावेसोबतचा 'संगीत मानापमान' मराठी सिनेमा चांगला गाजला. आता चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे.