येरे येरे पावसा: सिनेमातील साध्याभोळ्या अंजलीला ओळखलं का? मराठीसह हिंदी मालिकांमध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:38 PM2022-06-16T18:38:23+5:302022-06-16T18:48:27+5:30

Yere yere pavasa:एकीकडे पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण होत असतानाच एका प्रेम युगुलाची लव्हस्टोरी खुलत असते.

सध्या सोशल मीडियावर 'येरे येरे पावसा' (yere yere pavasa) या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली आहे. एका लहानशा खेडेगावातील लहान मुलं आणि पाऊस यांच्यावर ही कथा आधारित आहे.

पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या या मुलांना पाऊस सातत्याने चकवा देतो त्यामुळे त्यामुळे या आशा निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’.हा मराठी चित्रपट येत्या १७ जून म्हणजेच शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शफक खान दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगत असतानाच यातील काय बी, काय बी (Kaay Bi Kaay Bi) या गाण्याची तुफान चर्चा रंगली आहे.

एकीकडे पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण होत असतानाच एका प्रेम युगुलाची लव्हस्टोरी खुलत असते. यावर हे गाणं बेतलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यातील अभिनेत्री सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

गाण्यात झळकलेली ही अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यासाठी सध्या नेटकरी आतुर झाले आहेत.

येरे येरे पैसा या चित्रपटातील गाण्यात झळकलेल्या अभिनेत्रीचं नाव चिन्मयी साळवी असून तिने या चित्रपटात अंजली ही भूमिका साकारली आहे.

चिन्मयी हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने वागळे की दुनियासह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

चिन्मयीने हिंदी मालिकांसह ‘तू माझा सांगाती’, ‘छोटी मालकीन’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे.

विशेष म्हणजे चिन्मयी उत्तम नृत्यांगना असून तिने ‘दम दमा दम’,फूल टू धमाल या डान्स शोचं विजेतेपदही पटकावलं आहे.