काय ती साडी, काय तो swag...सोनाली कुलकर्णीचं दुबईत फोटोशूट, खास लूक चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:50 IST2024-05-07T16:24:21+5:302024-05-07T16:50:25+5:30

मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनाली कुलकर्णी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते.

सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

सोनालीनं हे खास फोटोशूट दुबईत केलं आहे. फोटोला कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, '#Dubai के #AlSeef को दिखाते हैं ….. #India की #sari और थोडा swag'.

तिचा हा खास आणि तितकाच स्पेशल लूक आहे. या फोटोंमध्येही खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये.

काळ्या रंगाची साडी, खास टिकली, गॉगल आणि कानातले यात सोनालीचं सौंदर्य खुललं आहे.

या देसी लुकमध्ये सोनाली अप्सरा दिसत आहे. यावेळी तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.

मराठीतील अगदी सगळ्याच अभिनेत्रींना साड्यांबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि सोनाली सुद्धा त्यातलीच एक आहे.

अलिकडेच सोनाली मलाइकोट्टाई वालिबान या मल्याळम सिनेमात झळकली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे.

सोनालीनं 'गाढवाचं लग्न', 'क्षणभर विश्रांती', 'अजिंठा', 'मितवा',' नटरंग', पोश्टर गर्ल', 'हिरकणी' या सिनेमांतून प्रेक्षकांची मनं जिंकली.

















