सिद्धार्थ जाधवची डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराला भेट, Photo शेअर म्हणाला,"माझा भीमराया..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:22 PM2023-05-12T12:22:27+5:302023-05-12T12:30:48+5:30

सिद्धार्थ जाधवने शेअर केलेले हे फोटो पाहिले का

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता. हिंदीतही सिद्धार्थची हवा आहे. कॉमेडी भूमिकांसाठी सिद्धार्थ जाधवला कायम पसंती दिली जाते. नुकताच त्याने रणवीर सिंहसोबत 'सर्कस' हा सिनेमा केला.

आता सिद्धार्थ 'कैरी' या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला लंडनला गेला आहे. तिथे फिरतानाचे फोटो त्याने अपलोड केले आहेत. अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री सायली संजीव यांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे.

तर सिद्धार्थच्या बकेट लिस्टमधली आणखी एक इच्छा पूर्ण झाली आहे. होय. सिद्धार्थने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराला भेट दिली आहे.

तिथले काही फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेत. तेथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्याने फोटोही काढला आहे.

तसंच घरातच बनवलेल्या एका छोट्या ग्रंथालयासमोर त्याने फोटो पोस्ट केलाय. यावेळी सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येतोय.

लंडन स्ट्रीटचा फोटोही त्याने पोस्ट केलाय. ज्याठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे हे निवासस्थान आहे. सिद्धार्थ जाधवचे हे फोटो चाहत्यांनीही पसंत केलेत.

सिद्धार्थने या पोस्टमधून महामानवाला अभिवादन केलं आहे.'माझा भीमराया' असं कॅप्शनही त्याने दिलं आहे. विश्वातल्या सर्वात सुंदर घराला भेट अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.