कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 15:42 IST2025-07-27T15:25:07+5:302025-07-27T15:42:47+5:30
'श्वास' सिनेमातील भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली. आता तो काय करतो?

आजोबा आणि नातवाची भावनिक कहाणी सांगणारा 'श्वास' हा सिनेमा मराठी सिनेमाच्या इतिहासातली दर्जेदार कलाकृती. २००४ साली आलेल्या या सिनेमाला सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
अभिनेते अरुण नलावडे यांनी साकारलेली आजोबांची भूमिका सर्वांच्याच हृदयाला भिडली. तसंच सिनेमात त्यांच्या नातवाच्या भूमिकेत दिसलेल्या चिमुकल्या 'परश्या'ने सर्वांना प्रेमात पाडलं.
या चिमुकल्याची भूमिका केली होती अश्विनी चितळेने (Ashwin Chitale). तेव्हा अश्विन फक्त ६-७ वर्षांचा होता. त्याने नंतर नागेश कुकनूर यांच्याच 'आशाएं' या हिंदी सिनेमातही काम केलं. तसंच नाना पाटेकर आणि जॉन अब्राहमच्या 'टॅक्सी नंबर ९२११'मध्येही तो नानांच्या मुलाच्या भूमिकेत होता.
अश्विन चितळे मूळचा पुण्याचा आहे. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून त्याने शालेय शिक्षण घेतले. सर परशुरामभाऊ कॉलेजमधून भूगोल, फिलॉसॉफी तसेच टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मधून इंडोलॉजि विषयातून त्याने शिक्षण पूर्ण केले आहे.
अश्विन आता काय करतो? तर अश्विनने आता स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. अश्विन हेरीटेज टुर्स असं त्याच्या कंपनीचं नाव असून तो स्वत: डायरेक्टर फाउंडर आणि सीईओदेखील आहे.
इतकंच नाही तर तो गेल्या काही वर्षांपासून फारसी भाषा शिकत आहे. इंडोलॉजीचा अभ्यासक म्हणून त्याने फारसी भाषा शिकायला सुरूवात केली.
याचदरम्यान त्याला ‘रूमी’भेटला. कोण रुमी? तर दिग्गज सूफी कवी रूमीच्या कवितांनी त्याला वेड लावलं. यानंतर अश्विनने रूमीच्या आयुष्यात खोलवर डोकावायला सुरूवात केली.
रूमीच्या पौराणिक कथा, त्याचे साहित्य संकलित करून त्याने त्याचे भाषांतर केले. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर तो फक्त रूमीच्या शायरी, कविता अपलोड करतो. रूमीवरच्या अनेक कार्यक्रमाचे नियोजन, कथाकथनही तो सादर करतो.