संस्कृती बालगुडेचा किलर स्टायलिश लुक! पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:16 PM2024-01-24T16:16:16+5:302024-01-24T16:31:52+5:30

संस्कृती बालगुडेचं हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे.

आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.

संस्कृती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. इन्स्टाग्रामवर अनेकदा त्याचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात.

आता पुन्हा तिने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

यामध्ये संस्कृती बालगुडे फारच ग्लॅमरस दिसून येत आहे.

या फोटोंमध्ये संस्कृती बालगुडे क्लासी अंदाजात पोज देताना दिसून येत आहे.

संस्कृती बालगुडेचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

छोट्या पडद्यावरील 'पिंजरा' मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे संस्कृती घराघरांत पोहचली. यानंतर तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं.

अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे.

नुकतेच तिचा ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! आणि 'आईच्या गावात मराठीत बोल' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.

संस्कृतीचा चाहतावर्ग मोठा असून मराठी सिनेसृष्टीत ती सध्या आघाडीवर आहे.