सई ताम्हणकरचं जबरदस्त फोटोशूट; वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिल्या फोटोसाठी हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 13:15 IST2024-03-24T13:11:50+5:302024-03-24T13:15:36+5:30

Sai tamhankar: सईने वेगवेगळ्या मूडमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या सगळ्या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि ब्युटिफूल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर सईने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

सईचा आज मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अलिकडेच सईने फोटोशूट केलं असून त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सई नेहमीप्रमाणे ग्लॅमरस दिसत आहे. त्यामुळे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत.

सईने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिचं नशीब आजमावलं आहे.

आजवर सईने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यामध्येच सध्या ती श्रीदेवी प्रसन्न, भक्षक या सिनेमांमुळे चर्चेत येत आहे.

सईने वेगवेगळ्या मूडमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या सगळ्या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.