पाहा, पिळगावकर कुटुंबाच्या छोट्याशा पण सुंदर गोवा ट्रिपचे तितकेच सुंदर फोटो...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 03:04 PM2021-09-08T15:04:30+5:302021-09-08T15:14:29+5:30

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया म्हणजे मराठीतील लोकप्रिय जोडपं. हे जोडपं नुकतंच गोव्याच्या छोट्याशा ट्रिपवरून परतलं.

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया म्हणजे मराठीतील लोकप्रिय जोडपं. हे जोडपं नुकतंच गोव्याच्या छोट्याशा ट्रिपवरून परतलं. आता ट्रिप म्हटलं की, या ट्रिपचे फोटोही आलेच. सचिन यांनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर या छोट्याशा पण सुंदर ट्रिपचे तितकेच सुंदर फोटो शेअर केले आहेत.

सचिन व सुप्रिया यांची लेक श्रिया आधीच गोव्यात होती. येथे तिचं शूटींग सुरु होतं. श्रिया गोव्यात आहे म्हटल्यावर सचिन व सुप्रियाही गोव्यात पोहोचले.

या ट्रिपमधील एकमेकांसोबत घावलेल्या काही निवांत क्षणाचे फोटो सचिन यांनी शेअर केले आहेत.

ट्रिप छोटी होती पण कुटुंबीयांसोबत मस्त वेळ घालवला आला, असं म्हणत सचिन यांनी हे फोटो शेअर केले आहेत. गोव्यात आईस्क्रीमचा आनंद घेतानाचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे..

गोव्यात कुलदैवत शांतादुर्गा, मंगेशी, महालक्ष्मी या मंदिरांनाही या जोडप्याला भेट देऊन दर्शन घेतलं.

हा फोटो म्हणजे, सचिन व सुप्रिया या जोडप्याचा एक सुंदर फोटो. लग्नानंतर इतक्या वर्षांनीही या जोडप्याचं प्रेम टवटवीत आहे.

श्रिया हिनेही तिचे गोव्यातील काही फोटो शेअर केले आहेत.