कश्मीर की कली! गडद हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रिया बापटचं क्लासी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 04:19 PM2024-03-15T16:19:58+5:302024-03-15T16:24:36+5:30

Priya bapat: प्रियाने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्यातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. आजवरच्या कारकिर्दीत प्रियाने अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे.

प्रिया मूळची मुंबईची असून दादरमध्ये तिचं बालपण केलं. प्रिया अनेकदा तिच्या बालपणाविषयी व्यक्त होत असते.

प्रियाने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने लहान असताना काम केलं.

प्रियाने सिनेमा आणि मालिकांव्यतिरिक्त नाटक आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.

प्रिया लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत कायम अव्वल स्थानावर असते. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.

प्रियाने नुकतंच व्हेलवेटच्या हिरव्या गडद ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

कश्मिर की कली म्हणत अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.