बोल्ड फोटोंसोबत प्रार्थना बेहरेने फ्लॉन्ट केला पाठीवरील टॅटू, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:39 PM2023-02-13T13:39:11+5:302023-02-13T13:44:04+5:30

Prarthana Behere : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील साधी-सोज्वळ नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे खऱ्या आयुष्यात बोल्ड आणि बिनधास्त आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील साधी-सोज्वळ नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे खऱ्या आयुष्यात बोल्ड आणि बिनधास्त आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

प्रार्थना बेहरेच्या फोटोंवर चाहते आणि कलाकार भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात.

तर दुसरीकडे अनेक नेटकऱ्यांना प्रार्थनाचा बोल्ड अंदाज खटकताना दिसून येतो आहे.

नुकतेच प्रार्थना बेहेरेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये एका फोटोत प्रार्थनाने तिच्या पाठीवरील टॅटू फ्लॉन्ट केला आहे.

या फोटोवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की,'फक्त टॅटू दाखविण्यासाठी इतकं सगळं करत आहेस'.

प्रार्थनाला टॅटूची आवड असल्याचे दिसून येते. तिने आपल्या पाठीवर दोन टॅटू काढले आहेत.

प्रार्थनाचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

प्रार्थना बेहरेचे इंस्टाग्रामवर २.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.