ऑस्ट्रेलियातील बीचवर पूजा सावंत नवऱ्यासोबत झाली रोमँटिक, शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:52 IST2024-08-13T12:40:54+5:302024-08-13T12:52:35+5:30
पूजा आणि सिद्धेशचा रोमँटिक वीकेंड, बीचवर घालवला वेळ

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant)सध्या ऑस्ट्रेलियात आहे. काही महिन्यांपूर्वीच पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) लग्नगाठ बांधली आणि ती चव्हाणांची सून झाली.
सिद्धेश ऑस्ट्रेलियातील एका नामांकित कंपनीत काम करतो. बऱ्याच वर्षांपासून तो तिथेच स्थायिक आहे. त्यामुळे पूजाही आता नवऱ्यासोबत काही महिने ऑस्ट्रेलियात तर काही महिने भारतात असते.
पूजाने नुकतंच ऑस्ट्रेलियातील बीचवरचे काही फोटो शेअर केलेत. यात तिचा लूक जबरदस्त दिसतोय. डोक्यावर हॅट, ब्लॅक स्कीन टाईट ड्रेस आणि वर स्टायलिश ट्रान्सपरंट श्रग अशा लूकमध्ये ती दिसत आहे.
यासोबतच सिद्धेशकडे कौतुकाने हसतच पाहतानाचा तिचा फोटोही खूप गोड आहे. सिद्धेशने व्हाईट टीशर्ट त्यावर हिरवं जर्किन, ब्लॅक पँट आणि डोळ्यावर गॉगल लावला आहे. या लूकमध्ये तो डॅशिंग दिसतोय.
याशिवाय पूजाने एक रोमँटिक फोटोही शेअर केला आहे. बीचकडे पाहत सिद्धेश पूजाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपाला आहे. तिची सुंदर अंगठी यात हायलाईट होत आहे.
पूजा आणि सिद्धेशने कालचा रविवार बीचवर एन्जॉय केला. त्यांच्यासोबत सिद्धेशची भावंडं होती. यात पूजा आणि सिद्धेशच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे.
पूजाचा 'मुसाफिरा' हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित झाला. आता पूजा कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.