गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:00 AM2022-03-11T07:00:00+5:302022-03-11T07:00:00+5:30

Anita date: 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिताने राधिका ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते-केळकर.

या मालिकेत अनिताने राधिका ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.

ही मालिका लोकप्रिय झाल्यापासून अनिताच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिची पर्सनल लाइफही चर्चेत येते.

अनिताच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे अनिताचा नवरा काय करतो, कसा दिसतो हे पाहुयात.

अनिताच्या नवऱ्याचं नाव चिन्मय केळकर आहे. अनिता आणि चिन्मयचं लव्हमॅरेज आहे.

ललित कला केंद्रात या दोघांची भेट झाली आणि या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं.

चिन्मयने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तोही कलाविश्वाशी निगडीत आहे.

चिन्मयला फोटोग्राफीची विशेष आवड आहे.

चिन्मय सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही.