'गलगले निघाले'मधील भरत जाधवची प्रेयसी आठवते का? आता झालाय कमालीचा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 07:49 PM2021-10-04T19:49:12+5:302021-10-04T20:00:27+5:30

Ketaki thatte: 'गलगले निघाले' या चित्रपटाच्या यशानंतर केतकीचा म्हणावा तसा कलाविश्वात वावर राहिला नाही.

अभिनेता भरत जाधवचा तुफान लोकप्रिय झालेला चित्रपट म्हणजे गलगले निघाले.

केदार शिंदे दिग्दर्शित गलगले निघाले या चित्रपटात भरत जाधव आणि केतकी थत्ते मुख्य भूमिकेत झळकले होते.

या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री केतकी थत्ते

या चित्रपटाच्या यशानंतर केतकीचा म्हणावा तसा कलाविश्वात वावर राहिला नाही. त्यामुळेच ही अभिनेत्री सध्या काय करते असा प्रश्न अनेकांना पडतो.

केतकी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहेत.

तिने अनेक नाटक,मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

केतकीचं काटकोन त्रिकोण हे नाटक विशेष गाजलं.

केतकीचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील ती एक यशस्वी उद्योजिका असल्याचं म्हटलं जातं.

केतकीचा स्वत:चा व्यवसाय असून तिने नेल पेंटिंगच्या व्यवसाय नवीन करिअर सुरु केलं आहे.