'मन रानात गेलं गं...' प्रिया बापटच्या सनकिस्ड फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 17:02 IST2024-04-19T16:51:00+5:302024-04-19T17:02:07+5:30
प्रिया बापट ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रियाने मराठी इंडस्ट्रीत आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
अभिनेत्रीचा नाटक, सिनेमा ,मालिका तसेच वेबसीरीजमध्ये दांडगा वावर असल्याचा पाहायला मिळतो.
मराठीसह हिंदी इंडस्ट्रीतही तिने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
'काकस्पर्श', 'टाईमपास- २' , 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' यांसारख्या मराठी सिनेमांमध्येही तिनं काम केलं आहे.
प्रिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
को- ऑर्ड सेट परिधान करून तिने हे फोटोशूट केलंय. प्रियाचा हा समर स्पेशल लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
अभिनेत्री प्रिया बापटच्या या सनकिस्ड फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.