समर्पण आणि शृंगार! 'फुलवंती'मधील शेवटचं नृत्य; प्राजक्ता माळीने शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:26 IST2024-10-24T14:15:07+5:302024-10-24T14:26:01+5:30
अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'फुलवंती' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

'फुलवंती' हा चित्रपट पेशवाईतील एका नर्तिकेच्या कथेवर आधारित आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय.
कला आणि बुद्धिमत्तेचा संघर्ष असणाऱ्या 'फुलवंती' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या सिनेमासाठी प्राजक्ताने प्रचंड मेहनत घेतली आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री भरतनाट्यम सादरीकरण करताना दिसते आहे.
नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर 'फुलवंती'मधील शेवटचं नृत्य सादर करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
'फुलवंती'मधून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.