स्पृहा जोशी पुन्हा चर्चेत; भर उन्हाळ्यात स्वेटटॉप घालून केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 02:14 PM2022-04-28T14:14:28+5:302022-04-28T14:17:19+5:30

Spruha joshi:सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे अनेक जण समर लूकमध्ये फोटो शेअर करत आहेत. मात्र, स्पृहाने स्वेट टॉप घालून फोटोशूट केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.

उत्तम अभिनयासह स्पृहा तिच्या कवितांमुळेही चर्चेत येत असते.

आज कलाविश्वात स्पृहाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तिच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती अनेकदा फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्याविषयीची माहिती देत असते.

अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे जे सध्या चर्चेत येत आहे.

सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे अनेक जण समर लूकमध्ये फोटो शेअर करत आहेत. मात्र, स्पृहाने स्वेट टॉप घालून फोटोशूट केलं आहे.

स्पृहाने लिंबू कलरच्या स्वेट टॉपमध्ये फोटोशूट केलं आहे.

स्वेट टॉपमध्ये स्पृहाने क्यूट पोझ दिल्या आहेत.