कुटुंबासोबत सोनालीची Pool party; वाढदिवसाचं केलं जंगी सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 14:40 IST2024-05-20T14:35:32+5:302024-05-20T14:40:47+5:30
Sonalee kulkarni: सोनालीने पूलपार्टी करत तिच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं.

मराठी कलाविश्वाची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. अभिनय, सौंदर्य आणि नृत्य यांमुळे ती कायम चर्चेत असते.
मराठी, हिंदीनंतर आता सोनालीने मल्याळम सिनेमातही पदार्पण केलं आहे. अलिकडेच ती दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या सिनेमाच्या माध्यमातून तिने साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केलं
सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. अभिनयासह सोनाली सध्या तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनमुळे चर्चेत येत आहे.
नुकताच सोनालीने तिच्या कुटुंबासह मोठ्या थाटात तिचा वाढदिवस साजरा केला.
सोनालीने पूलपार्टी करत तिच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं.
या पार्टीमध्ये सोनालीच्या सासरची आणि माहेरची मंडळी उपस्थित होती.
सोनालीचे नटरंग, हिरकणी, मितवा हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बरेच गाजले.