केतकी माटेगांवकरचा बोल्ड लूक वेधतोय चाहत्यांचं लक्ष; पहिल्यांदाच दिसला इतका ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 18:01 IST2022-06-22T17:57:43+5:302022-06-22T18:01:05+5:30
Ketaki mategaonkar:अलिकडेच केतकीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

उत्तम आवाजासह अभिनयामुळे चर्चेत येणारी गायिका, अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.
आजवर अनेक गाण्यांच्या माध्यमातून केतकीने श्रोत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
केतकी सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिच्याविषयीचे अपडेट्स देत असते.
अलिकडेच केतकीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
केतकीने केलेलं बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
केतकीने ब्लँक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत.
केतकीला अभिनय आणि गायनाव्यतिरिक्त फिरण्याचीही आवड आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असते.
केतकी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, गायिका असून तिने लहान वयातच संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली.