हिरवी साडी अन् हिरवा चुडा! सायली संजीवच्या फोटोंची चर्चा, अंबाजोगाईला गेली अभिनेत्री, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:32 IST2026-02-25T13:14:49+5:302026-02-25T13:32:09+5:30
सायली संजीवने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे. सायली सध्या अंबाजोगाईला गेली आहे. त्यामागचं कारण समोर आलं आहे

काहे दिया परदेस मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. सायली सोशल मीडियावर चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.

सायली संजीवने केलेल्या लेटेस्ट फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे. सायली सध्या अंबाजोगाईला गेली आहे. तिथे सायलीने हे खास फोटोशूट केलं आहे.

सायली संजीवने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून त्याला मॅचिंग लाल रंगाचं ब्लाऊज परिधान केलं आहे. कोणताही जास्त मेकअप न करता सायलीने हे फोटोशूट केलं आहे

सायली या साध्या सोज्वळ पारंपरिक फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसतेय. सायली इवलीशी टिकलीही कपाळाला लावली आहे. सायलीचे हे फोटो व्हायरल होताच अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

अंतिशय सुंदर, लय भारी दिसतेय, खूप गोड आणि सुंदर अशा कमेंट करुन सायलीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. सायलीचा हा सुंदर अंदाज तिच्या चाहत्यांना भावला आहे

सायलीने अंबाजोगाईत हे खास फोटोशूट केलं आहे. सायली अंबाजोगाईला जाण्यामागे खास कारण आहे. आगामी प्रोजेक्टच्या निमित्ताने सायली या ठिकाणी गेली आहे.

सायलीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच दोन मराठी सिनेमांमध्ये झळकली. यापैकी एका सिनेमात तिची जोडी शशांक केतकरसोबत जमली होती.

















