सौंदर्य तिचं आरस्पानी! मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या सविता प्रभूणेंची लेक दिसायला सुंदर, अभिनय नाही 'या' क्षेत्रात करते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:53 IST2025-10-30T16:38:25+5:302025-10-30T16:53:42+5:30

सविता प्रभुणे यांच्या लेकीपुढे अभिनेत्रीही पडतील फिक्या, फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री सविता प्रभूणे यांचं नाव मराठी कलाविश्वात मोठ्या आदराने घेतलं. छक्के पंजे, खरा वारसदार, लपंडाव, कळत नकळत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या मध्यवर्ती भूमिका प्रचंड गाजल्या.

सविता प्रभूणे यांनी आजवर मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमामध्ये काम करुन चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.

चेह-यावरच्या निखळ हास्याने आणि सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ त्यांनी गाजवला.

सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत काम करताना दिसत आहे. टीव्हीवर प्रेमळ सासू, आई साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या मुलीला तुम्ही पाहिलंय का?

सविता प्रभुणे यांच्या मुलीचं नाव सात्विका आहे. घटस्फोटानंतर त्यांनी एकटीने मुलीचं संगोपन केलं.

सात्विकाने पार्ले टिळकमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सात्विकाने एमबीएची पदवी घेतली आणि याचदरम्यान ती मॉडेलिंगकडे वळली.

2014 मध्ये वॅन हुसेन कॉम्पिटिशनमध्ये मॉडेल म्हणून तिने सहभाग घेतला.सात्विकाचं लग्न झालं असून ती तिच्या संसारात व्यस्त आहे.