'बिग बॉस'फेम नेहा शितोळेचा नवरादेखील आहे अभिनेता; 'कमीने' चित्रपटात साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:43 AM2021-11-22T10:43:45+5:302021-11-22T10:48:58+5:30

Neha shitole:नेहा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे आणि खासकरुन नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

bigg boss marathi च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नेहा शितोळे.

उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर नेहाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तर, बिग बॉसच्या घरात आपली खिलाडू वृत्ती दाखवत तिने प्रेक्षकांची मनंही जिंकली.

बेधडक आणि बिंधास्त व्यक्तीमत्त्व असलेल्या नेहाविषयी तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. त्यामुळेच आज नेहाचा नवरा कोण आहे हे जाणून घेऊयात.

नेहा ज्याप्रमाणे कलाविश्वात सक्रीय आहे. तसाच तिचा नवरादेखील मराठी कलाविश्वाशी निगडीत आहे.

नेहा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे आणि खासकरुन नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

नेहा आणि तिच्या नवऱ्याकडे पाहिल्यानंतर तर ते एकमेकांचे जोडीदार असण्यासोबतच खूप चांगले मित्र असल्याचं पाहायला मिळतं.

नेहाच्या नवऱ्याचं नाव नचिकेत पूर्णपत्रे (Nachiket Purnapatre) असं असून तोदेखील मराठीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

नचिकेतने कमीने, रॉकी हँडसम, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर यांसारख्या हिंदी तसेच झिपऱ्या, अस्तू यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नेहानेदेखील अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रेडीमिक्स, सुर सपाटा, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध बेवसिरिजमध्ये ती काटेकरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसली होती.