शिक्षिकेचा पेशा सोडून अभिनेत्री बनली, म्हणाली- "विद्यार्थी गुलाबाची फुलं आणि शायरी लिहून पाठवायचे..."

By कोमल खांबे | Updated: January 27, 2025 15:25 IST2025-01-27T15:16:32+5:302025-01-27T15:25:06+5:30

अभिनेत्री बनण्याआधी कॉलेजवर शिकवलं, विद्यार्थी द्यायचे गुलाबाचं फूल

'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांमधून अभिनेत्री माधुरी पवार हिला लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्तम डान्सरही आहे.

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून सामान्य कुटुंबातून आलेल्या अभिनेत्री माधुरी पवारने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

पण, अभिनेत्री होण्याआधी माधुरी एक शिक्षिका होती. आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ती शिकवत होती.

माधुरीने नुकतंच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने करिअर, शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं.

माधुरीने शिक्षिका होण्याचं शिक्षण घेतलं आहे. याशिवाय HR या विषयात तिने एमबीए केलं आहे. अभिनयाआधी दोन वर्ष ती साताऱ्यातील एका कॉलेजमध्ये ती लेक्चरर होती.

"मी पूर्वी अशी नव्हते. मी तेव्हा टॉमबॉइश होते. माझं फ्रेंडसर्कलही फार कमी आहे. आणि मी इंट्रोवर्ट आहे".

"कॉलेजमध्ये शिकवत असताना मी विद्यार्थांना घरी अभ्यासाठी काही प्रश्न द्यायचे. दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका घरी तपासायला नेल्यावर त्यात शायरी लिहिलेल्या असायच्या".

"काहीमध्ये गुलाबाची फुलं असायची. मी साडी नेसायचे आणि एका साईडला वेणी घालायचे"

"आज तुम्ही घातलेली तिरकी वेणी खूप सुंदर दिसत होती. वेणीमध्ये एक फूल लावत जा, असंही लिहायचे."

"त्या विद्यार्थ्यांना कसं बोलू हे मला समजत नव्हतं. मी कॉलेजच्या मुख्यध्यापकांना याबाबत सांगितलं. तर ते म्हणाले की मॅम तुम्ही तरूण आहात, तर या गोष्टी घडणार. याला आपण विरोध करू शकत नाही"

"त्यामुळे मग मला असं वाटलं की मला हे करायचं नाहीये. आणि याच कारणामुळे मग मी तो जॉब सोडला", असं माधुरी म्हणाली.