'या' प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतीये ईशा केसकर; 'पावनखिंड'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 07:00 AM2022-03-02T07:00:00+5:302022-03-02T07:00:00+5:30

Isha Keskar: ईशा मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असून अनेकदा ती त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर.

या मालिकेत ईशाने शनायाची भूमिका साकारली होती. त्यामुळे आजही ईशा तिच्या याच भूमिकेसाठी खासकरुन ओळखली जाते.

कलाविश्वाप्रमाणेच ईशा सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा तिची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते.

सध्या सोशल मीडियावर ईशा आणि तिच्या प्रियकराची चर्चा रंगली आहे.

ईशा मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असून अनेकदा ती त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

ईशा, गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे.

काहे दिया परदेस या मालिकेच्या माध्यमातून ऋषी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि, लोकप्रिय झाला.

अलिकडेच ऋषी पावनखिंड या चित्रपटात झळकला. या चित्रपटात त्याने रुस्तमे जमान ही भूमिका साकारली आहे.

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्या भेटीतच ईशाला ऋषी आवडला होता.

त्यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांचं बोलणं सुरू झालं आणि ईशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. या कॉफी डेटनंतर त्याची लव्हस्टोरी खऱ्या अर्थाने सुरु झाली.