गिरीजा ओकच्या नवऱ्याविषयी माहितीये का?जाणून घ्या गिरीष ओक यांच्या जावयाविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 04:54 PM2022-04-22T16:54:39+5:302022-04-22T16:58:26+5:30

Girija oak-godbole: सोशल मीडियावरही गिरीजा सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक.

उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गिरीजाने मराठीसह हिंदी चित्रपट, मालिकांमध्येही काम केलं आहे.

गिरीजा लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच एका दिग्गज अभिनेत्याची लेक आणि सुप्रसिद्ध अभिनेत्याची सूनदेखील आहे.

गिरीजा ही गिरीष ओक यांची मुलगी आहे. तर, श्रीरंग गोडबोले यांची सून आहे.

वयाच्या 15 व्या वर्षापासूनच गिरिजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 'लज्जा' ही मराठी मालिका तसेच 'लेडीज स्पेशल' या हिंदी मालिकेत गिराजीने साकारलेल्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती.

सोशल मीडियावरही गिरीजा सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करते.

सध्या सोशल मीडियावर तिच्या नवऱ्याची चर्चा रंगली आहे.

गिरीजाच्या नवऱ्याचं नाव सुहृद गोडबोले (Suhrud godbole) असं आहे.

गिरीजा आणि सुहृदने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगादेखील आहे.

गिरीजाप्रमाणेच सुहृददेखील सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे.