Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:37 IST2025-06-05T16:04:10+5:302025-06-05T16:37:54+5:30
Cannes to धामापूर...! छाया कदम रमल्या कोकणातील निसर्गरम्य वातावरणात; शेअर केले फोटो

'सैराट', 'लापता लेडीज, 'मडगांव एक्सप्रेस' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी अभिनेत्री म्हणजे छाया कदम.
अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. त्यांच्या अभिनयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं.
अलिकडेच अभिनेत्री छाया कदम कान्स फेस्टिव्हलमुळे चर्चेत आल्या होत्या. सलग दुसऱ्यांदा त्यांनी या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली.
'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मुळे छाया कदम प्रचंड चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, कान्सनंतर छाया या त्यांच्या मुळगावी कोकणात परतल्या आहेत. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात त्या रमल्याचं पाहायला मिळत आहेत.
नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो, व्हिडीओ शेअर केले आहे. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'कान्स' नंतर छाया कदम त्यांच्या गावी क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत.
"Cannes to धामापूर...", असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.